विनाश अटळ आहे

 माणसाचं पोट भरलं की त्याला ढेकर येते. ह्याचा अर्थ आता पोट भरलंय. आता तो माणूस अजून खात राहिला तर उलट्याअपचन, पोट बिघडण्यासारखे प्रकार घडतात.

हाच नियम निसर्गालाही लागू होतो.

तो मनुष्य प्राण्याला पुरेसा सतर्कतेचा इशारा देत असतो.

पण माणूस पुन्हा पुन्हा त्याच चुका करत राहिला तर मात्र झटका देण्यापलिकडे निसर्गाकडे काहीच उपाय शिल्लक राहत नाही.

  • निसर्ग कोपला तर काय होऊ शकतं ह्याची झलक 2004 साली कन्याकुमारीत पहायला मिळाली सुुनामी च्या रुपात.
  • निसर्ग कोपला तर काय होऊ शकतं हे केदारनाथ च्या पूराने दाखवून दिलं. केदारनाथच देऊळ भाविकांसाठी उघडं व्हायला 1 वर्ष लागलं होतं.
  • जागतिक तापमान हे अजून 1.5 अंश सेल्सियस ने वाढलं तर समुद्राच्या लाटांची पातळी वाढेल आणि मग विनाश अटळ होऊन बसेल. ह्यासाठी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत.
  • पृथ्वी (जमीन), आप (पाणी), तेज (अग्नी), वायू (पवन) आणि आकाश (पोकळी) ही पंचमहाभूते आहेत. ह्यांच्याशी खेळ केला किंवा हे खवळले तर दिवसा तारे दिसतात.
  • मनुष्य प्राण्याला अवकाशाबद्दल जेवढी माहिती आहे त्यापेक्षा खूप कमी माहिती ही महासागरांबद्दल आहे.
  • वातावरणात कार्बन चं प्रमाण 420 ppm (parts per million) पेक्षा वाढलं जागतिक तापमान काही अंशांनी वाढेल आणि आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल. ह्याचा सामना करण्यासाठी CBDR (Common But Differentiated Responsibility) च्या कराराला सर्व देशांनी मान्यता दिलेली आहे.
  • निसर्ग कोपला तर काय होऊ शकतं ह्याचा अनुभव महिन्या - दीड महिन्यापूर्वी सांंगली - कोल्हापूर ने घेतला.

त्यामुळे माणूस शहाण्या सारखं वागला आणि त्याने नैसर्गिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला तरच मनुष्य संस्कृती वाचेल.

अन्यथा विनाश अटळ आहे

Comments